संदेश कार्ले मित्रमंडळाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचा अभीष्टचिंतन सोहळा खंडाळा येथे उत्साहात पार पडला. संदेश कार्ले मित्रमंडळाच्या वतीने केलेल्या आवाहनाला नगर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शुक्रवार 06 डिसेंबर रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर शुभचिंतकांनी फोन, मॅसेज, हॉट्अप, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. काहींनी प्रत्यक्ष भेट घेऊन शाल श्रीफळ देत शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील राजकीय वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
गावोगावी जाऊन संदेश कार्ले यांनी आभार मानले.
नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. या निवडणुकीत कार्ले यांच्यासाठी अनेकांनी मतदारसंघ पिंजून काढला. प्रचारासाठी दिवसरात्र कष्ट घेतले. पारनेर मतदारसंघात काशीनाथ दाते, राणी लंके व संदेश कार्ले यांच्यात तिरंगी झालेल्या लढतीत दाते यांचा विजय झाला. तर कार्ले यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राणी लंके यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे नागरिक सांगतात. दरम्यान, निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवसांपासून कार्ले यांनी गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानले.