अहमदनगर । नगर सहयाद्री
घरफोडी करणारेणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. विष्णु सोनबा धोत्रे ( रा. वडारवाडी, केडगाव, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीपीकडून एकुन 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी मधुकर तबाजी भावले ( रा. शाहुनगर, केडगाव, अहमदनगर) हे ते त्यांच्या मुलाकडे दि.७ मे ते १२ मे रोजी दरम्यान पुणे येथे गेलेले असताना त्यांचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांने चोरी केली असल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास कामी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकास आदेश दिले होते. तपासा दरम्यान गुन्हे शोध पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा वडारवाडीतील विष्णु धोत्रे याने केला असून त्याच्यावर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्यावरुन गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतेले त्याच्याकडून 28 हजार रुपये रोख रक्कम, 22 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे व चांदीच्या वस्तु असा एकुन 50 रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि योगिता कोकाटे, पोउपनिरी प्रविण पाटील, पो.हे.कॉ. राहुल शिंदे, पो. हे. कों शाहीद शेख, पो.हे.कॉ. योगेश भिंगारदिवे, पो.हे.कॉ. ए.पी.इनामदार, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, मपोना संगिता बडे, पो.कॉ. अभय कदम, पो.कॉ. दिपक रोहोकले, पो.कॉ. सत्यजित शिंदे, पो.कॉ. तानाजी पवार, पो.कॉ. सुरज कदम, पो.कॉ. प्रमोद लहारे, पो.कॉ. अमोल गाडे, पो.कॉ. सुजय हिवाळे, पो.कॉ. सचिन लोळगे यांच्या पथकाने केली आहे.