पारनेर । नगर सहयाद्री:-
कोणत्याही क्षेत्रात अहंकार हा चालत नाही, लोकशाहीमध्ये अहंकार करणाऱ्याची जनता वाट लावल्याशिवाय राहत नाही. जनता डोक्यावरही घेते आणि जमिनीवरही आणते. बारा झिरो करण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी जमिनीवर आणले. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. निघोजकरांनो विचार बदला विरोधाला विरोध करू नका तुमचा विकास करून घ्या विकासाच्या मुद्द्यावर एक व्हा असे आवाहन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
निघोज ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रिय आमदार काशिनाथ दाते सर यांचा भव्य सत्कार समारंभ व मतदारांचे आभार आयोजन कार्यक्रम प्रसंगी आमदार काशिनाथ दाते सर बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, प्रभाकर कवाद, सचिन पाटील वराळ, सागर मैड, पंकज कारखिले, विक्रम कळमकर, राजाराम एरंडे, सुधामती कवाद, भास्कर उचाळे, सरपंच चित्राताई वराळ, मनोज मुंगशे आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. दाते म्हणाले, माझी जनता आणि माझे मतदारसंघात करावयाचा विकास हेच माझं ध्येय असणार आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. निघोजमध्ये विकासाची सर्व कामे करून देईन हा अजित दादाचा वाद आहे तो पक्का असतो तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपणाला शांततेने राजकारण करायचे आहे. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला, आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, आमच्या लाडक्या बहिणीने जो विश्वास टाकला त्यांच कौतुक करावं तेवढं कमीच आहे, माझ्या बहिणी कुठल्याही आमिषाला बळी पडल्या नाहीत. उद्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला असंच यश द्या असे आवाहन आमदार दाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद ठुबे यांनी केले.
दादांचा वादा पूर्ण होणार
आमदार काशिनाथ दाते सर गेले ४० वर्षापासून तालुक्यात काम करत आहे. निघोजकरांनो आदरणीय दादा व विखे साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ आमदार दाते सर दिल्याशिवाय राहणार नाहीत. मळगंगेच्या आशीर्वादाने आजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दादांनी आणली व पंधराशे रुपये देण्याचा वादा माझ्या लाडक्या बहिणींचा पूर्ण केला. त्या बहिणींनी भावाला आशीर्वाद दिला, दादांनी व महायुती शासनाने बहिणींना लवकरच शासन आल्यावर एकवीशे रुपये देण्याचा वादा पूर्ण होणार आहे.
प्रशांत गायकवाड ( संचालक, अहमदनगर जिल्हा बँक )
आमच्या नेत्याच्या पराभवाचा बदला घेतला
सत्तेचा दुरुपयोग केला म्हणून लोकांनी तुम्हाला डोक्यावरून खाली सोडले, पाच महिन्यापूर्वी लोकांनी तुम्हाला निवडून दिले होते, पारनेर तालुका हा वैचारिक आहे. भल्या भल्यांना लोकांना जागा दाखवली आहे. तीच तुमची गत झाली. मा. खा. डॉ. सुजय दाद विखे पाटील यांचा पराभवाचे शल्य आम्ही कधीही विसरू शकत नाही, सर आपण विजयी झाल्याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला झाला कारण आमच्या नेत्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेतला.
– सचिन पाटील वराळ ( युवा नेते, निघोज)