spot_img
ब्रेकिंगBreaking : विनायक मेटेंचे लहान भाऊ रामहरी मेटे शिवसंग्राममधून बाहेर

Breaking : विनायक मेटेंचे लहान भाऊ रामहरी मेटे शिवसंग्राममधून बाहेर

spot_img

बीड / नगर सह्याद्री : राजकीय वलयात अनेक विविध घडामोडी घडत असताना आता एक मोठी बातमी आली आहे. शिवसंग्रामचे नेते तथा माजी आ.स्व.विनायक मेटे यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी या संघटनेतून बाहेर पडत स्वतंत्र संघटना उघडली आहे. जय शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून ते आता काम करणार आहेत.

रामहरी मेटे यांच्याकडे आधी युवा जिल्हाध्यक्ष पद होते. परंतू मेटे यांच्या निधनानंतर त्यांनी हे पद सोडले होते. शिवंग्राममधील अंतर्गत धुसफूस आणि होत असलेली घुसमट यामुळेच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आता जय शिवसंग्रामच्या माध्यमातून मेटे साहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे रामहरी मेटेंनी सांगितले. मेटे बाहेर पडणे हे शिवसंग्रामला मोठा धक्का समजला जात आहे.

विनायक मेटे हे विधान परिषद सदस्य होते. त्यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून सामान्यांसाठी आवाज उठविला, अनेक प्रश्न मार्गी लावले. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ते पुढे असत. दुर्दैवाने १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघातात त्यांचे निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संघटनेची सर्व जबाबदारी त्यांची पत्नी डॉ.ज्योती मेटे यांच्या खांद्यावर आली. तसेच मेटे यांच्या निधनानंतर युवा जिल्हाध्यक्ष तथा मेटे यांचे लहान बंधू रामहरी मेटे हे पदावरून बाजूला झाले. मागील काही दिवसांपासून ते शिवसंग्रामपासून दोन हात लांब होते. ते नाराज असल्याचीही चर्चा होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा सैराट! बहिणीच्या बॉयफ्रेंडला आई अन् भावाने संपवलं

पुणे । नगर सहयाद्री :- पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बहिणीच्या बॉयफ्रेंडचा...

‘पुढील आठवड्यात सरपंच आरक्षण सोडत’

महिला आरक्षण उपविभागीय, तर सर्वसाधारण अन्य प्रवर्गाचे तहसील पातळीवर काढणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री ग्रामविकास विभागाने...

फडणवीस सरकारचा ‘मोठा’ निर्णय; अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

गैरप्रकार सहन केला जाणार नाही: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई | नगर सह्याद्री रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच...

फलक लावणे गैर काय? ते माझे काका!; आमदार रोहित पवारांनी भूमिका केली जाहीर

कर्जत । नगर सहयाद्री:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर...