spot_img
ब्रेकिंगब्रेकिंग! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची बस दरीत कोसळली; पाच भाविकांचा मृत्यू , कुठे...

ब्रेकिंग! पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची बस दरीत कोसळली; पाच भाविकांचा मृत्यू , कुठे घडली घटना?

spot_img

Bus Accident News: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा पनवेलजवळ अपघात झाला. बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली. या अपघात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

डोंबिवलीकडून पंढरपूरला एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघाले होते. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला. त्यामुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला असून ५ प्रवासी जागीच ठार झाले. तर ४२ प्रवासी जखमी झाले आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. मात्र, बसमधील प्रवासी डोंबिवली येथील रहिवासी असल्याचे सामोरे आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...