spot_img
अहमदनगरब्रेकिंग : मराठा आरक्षणाबत खा. सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

ब्रेकिंग : मराठा आरक्षणाबत खा. सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

spot_img

लोणी / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी काही बोलले तरी त्याचा विपर्यास होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

खा.सुजय विखे पाटील यांनी राहाता, शिर्डी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणी पाठिंबा असल्याचे नमूद करून खा. विखे पाटील म्हणाले की, आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता नेत्यांची घर जाळण्यापर्यत येवून ठेपणे हे योग्य नाही.

आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनीधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वच लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला आहे. परंतू आज जाहीर भाष्य करायला सरपंच पदापासून ते सर्वच पदावर असलेले नेते पुढे येत नाहीत. याकडे लक्ष वेधून प्रतिक्रीया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे विखे पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावर सामूहिकपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...