मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर विविध आंदोलने सुरु असताना आता आणखी मोठी बातमी आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी आणखी वेळ मागीतला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती मागासवर्ग आयोगाने केली आहे.
मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे आणखी वेळ वाढवून मागितला आहे. मराठा आरक्षणाच्या अहवालाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आणखी २ ते ३ दिवस वाढवून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे.
या मागणी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा होऊन विशेष अधिवेशन कधी घ्यायचे यावर शिक्कामोर्तब होण्याची आज दाट शक्यता आहे. या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री गण उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.