spot_img
राजकारणब्रेकिंग : मोदी सरकारचा काँग्रेसवर प्रहार ! 'युपीए' सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवहाराची...

ब्रेकिंग : मोदी सरकारचा काँग्रेसवर प्रहार ! ‘युपीए’ सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवहाराची श्वेतपत्रिका सादर

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : मागील दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. आता एक मोठा प्रहार मोदी सरकारने केला आहे. मोदी सरकारने लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली आहे. काँग्रेस म्हणजेच युपीए सरकारच्या काळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात ही श्वेतपत्रिका आणण्यात आली आहे.

या श्वेतपत्रिकेत यूपीए दशक आणि एनडीए दशकाचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या होत्या. यूपीए राजवटीतील आर्थिक गैरव्यवस्थापन आणि एनडीए राजवटीतील आर्थिक व्यवस्थापन यामध्ये मांडण्यात आले आहे.

* काय आहे या श्वेतपत्रिकेत
या श्वेतपत्रिकेमध्ये युपीए सरकारचा लेखाजोखा मांडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यूपीए सरकारने देशाचा आर्थिक पाया कमकुवत केल्याचे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. यूपीएच्या काळात रुपयाची मोठी घसरण झाली होती. बँकिंग क्षेत्र संकटात होते, परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली होती, मोठे कर्ज घेतले होते तसेच महसुलाचा गैरवापर झाला होता, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....