जालना / नगर सह्याद्री : मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत महत्वाची माहिती समोर अली आहे. १७ दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे.
जरांगे पाटील हे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून उद्यापासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना त्यांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्तत:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. गावातील महिलांच्या हातून रस पेऊन ते उपोषण मागे घेणार असल्याचं कळतंय. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.
दरम्यान शंभूराजे देसाई यांनी ईसार दिला आहे. ते म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गृहविभागाला एवढंच सांगितलं आहे की अशा भडक वक्तव्यामुळे अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचणार असेल,
संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याचा अशा पद्धतीने अवमान होत असेल तर कायदा कायद्याचं काम करेल. पोलीस पोलिसांचं काम करतील. त्यांची वक्तव्ये तपासली जातील. चौकशी केली जाईल. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही निश्चितपणाने करू अशीही माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.