Manoj Jarange Patil: आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं होत. सलाईन लाऊन उपोषण करणे योग्य नाही, असे म्हणत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपोषण स्थगित करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले होते. आज त्यांच्या उपोषणाचा ९ वा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. अंतरवाली सराटीत देखील समाजाने मोठया प्रमाणात गर्दी केली आहे.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोर्टाच्या निर्देशानसुार आपण उपचार घेत असून सलाईन लाऊन उपोषण करणे योग्य नाही, असे म्हणत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपोषण स्थगित करणार असल्याचे जाहीर केले.
सरकारला काय दिला इशारा?
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा करण्याआधी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. फडणवीस साहेब हाताने सत्ता घालवू नका. मराठा समाज वाट पाहतोय. नाहीतर आरक्षणासाठी आम्हाला सत्तेत बसावे लागेल, असे जरांगे यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत जल्लोष केला.