spot_img
ब्रेकिंगBreaking ! जालन्यात धनगर आरक्षण मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहने...

Breaking ! जालन्यात धनगर आरक्षण मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, वाहने फोडली

spot_img

जालना / नगर सह्याद्री : जालन्यामध्ये सुरु असणाऱ्या धनगर आरक्षण मोर्चाला हिंसक वळण लागले.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली.यावेळी शासकीय वाहने, दुचाकी गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मिळण्यासाठी गांधी चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. कार्यालयासमोर सभा घेण्यात आली. यानंतर निवेदन देताना समाज उग्र झाल्याने अनुचित प्रकार घडला.

मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आली नाहीत, त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुफान दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी परिसरात तणावाचे वातावरण होते. तत्काळ कार्यालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. काही वेळाने आंदोलक परत गेली.

‘या’ आहेत मागण्या
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करावी
शहरातील अंबड चौफुली परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास जागा उपलब्ध करून द्यावी
जातनिहाय जनगणना करण्यात यावी
मेंढपाळांना शस्त्र परवाने द्यावे, मेंढ्यांना चरण्यासाठी वने राखीव ठेवावी

शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा
प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे
आरक्षण लढयात शहीद झालेल्या समाजबांधवांच्या कुंटूबातील एकास शासकीय नोकरी द्यावी
शासनामार्फत सवलतीच्या दरात कर्ज द्यावे
सर्वच क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...