spot_img
अहमदनगरब्रेकिंग! दिवसा ढवळ्या दरोडा? ते आले आणि लाखोंचा ऐवज घेऊन पसार झाले

ब्रेकिंग! दिवसा ढवळ्या दरोडा? ते आले आणि लाखोंचा ऐवज घेऊन पसार झाले

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
तालुक्यातील वारणवाडी येथे दिवसा ढवळ्या बंद घरावर दरोडा टाकत ११ लाख ७९ हजार रुपयांच्या ३५ तोळ्याच्या सोन्या- चांदीच्या दागिन्यावर दरोडेखोरांनी डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्वप्निल पांडुरंग काशिद (वय ३६ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. वारणवाडी, ता. पारनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी काशिद शेतीसोबत खडकवाडीत हॉटेल व्यवसाय करतात. दि. २९ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे ते हॉटेलवर गेले होते. तसेच कटूंबातील सदस्य शेती कामासाठी शेतात गेले होते. संध्याकाळी ७ वाजता कटूंबातील सदस्य परतले असतांना घराचे कुलूप तोंडून घरातील सामान उचकापाचक करुन अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडून १८ तोळे वजनाची गळ्यातील साखळी, १२ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, १२ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १० ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ११ लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

नागरिकांनी दिवसा किंवा रात्री आपल्या मौल्यवान वस्तू जवळ न बाळगता बँक लॉकरमध्ये किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात असे आवाहन पारनेर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यात चार दिवसात दोन घटना
बंद घर हे चोरट्यांनी लक्ष केले असून चार दिवसांपूर्वी नगर कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथील ढुस वस्तीवरील बंद घराचे कुलूप तोडत साडेतीन तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. तर सोमवारी वारणवाडी येथील काशीद कुटुंबियांच्या घराचे कुलूप तोडून ३५ तोळे दागिने लंपास केले असल्याची दुसरी घटना घडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...