spot_img
राजकारणBreaking ! राजू शेट्टींवर गुन्हा दाखल, पहा काय आहे प्रकरण

Breaking ! राजू शेट्टींवर गुन्हा दाखल, पहा काय आहे प्रकरण

spot_img

सांगली / नगर सहयाद्री : पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याची तोडफोड केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यात ऊस दरासाठी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उसाच्या दरासाठी झालेल्या आंदोलनामुळे १० तास कारखाना बंद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोपही आंदोलकांवर करण्यात आला आहे.

१ डिसेंबर रोजी राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह इस्लामपूर येथील राजारामबापू कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन केले होते. या आंदोलनात दहा तासात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने गाळप बंद करण्यात आले. यामुळे ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्यातील साखर, इथेनॉल निर्मिती, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत केली होती.

या तक्रारीनुसार, राजू शेट्टी, भागवत जाधव आदींसह १५० जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली आहे.

राजारामबापू साखर कारखान्याकडून ३१०० रुपये पहिली उचल आणि गेल्या हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल ३२०० रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...