नवी दिल्ली / नगर सहयाद्री :
आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यावेळी २०२४ मध्ये भाजपाला 370 तर NDA ला 400 हून अधिक जागा मिळतील असा दावाच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. दरम्यान आता नागरिकत्व सुधारणा कायद्यासंर्भात (CAA) बोलताना शाह म्हणाले, 2019 मध्ये कायदा लागू झाला होता. यासंदर्भात नियम जारी केल्यानंतर, लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केला जाईल. सीएए हा देशाचा कायदा आहे. याचे नोटिफिकेशन निश्चितपणे होईल. निवडणुकीपूर्वीच सीएए आमलात येईल. यात कुणालाही कंफ्यूजन असायला नको असे ते म्हणालेत.
* मुस्लीम बांधवांची दिशाभूल होतेय
‘CAA संदर्भात मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांना भडकवले जात आहे. CAA केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात छळ सहन करून भारतात आलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. हा कायदा कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असे शाह यांनी म्हटले आहे.
* काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)
नागरिकत्व (सुधारणा) कायदा अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील (हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी) बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.