bus-truck accident: बस-ट्रकचा भीषण अपघाताची घटना वाऱ्यासारखी पसरत आहे. अपघातामध्ये पाच ते सहा प्रवाशाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर बस मधील अनेक प्रवाशी जखमी झाले आहे.
नाशिकच्या चांदवमधील मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुडच्या घाटात अपघात घडला आहे. भरधाव बसचे टायर फुटल्यामुळे चालकांचे बस वरील नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या ट्र्कवर बस अचानक येऊन आदळली यामुळे मोठा अपघात घडला.
यावेळी बस मधील ५ ते ६ पाच ते सहा प्रवाशाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर बस मधील इतर प्रवाशी देखील जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. जखमींना घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे.