spot_img
देशनवी कार घेतली, पाच मित्र फिरायला गेले, पण..भीषण अपघात, एकच वाचला..

नवी कार घेतली, पाच मित्र फिरायला गेले, पण..भीषण अपघात, एकच वाचला..

spot_img

लखनऊ / नगर सह्याद्री : नवी कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते स्वप्नपुर्तीचा आनंदही काही वेगळाच असतो. परंतु हाच आनंद काही मित्रांच्या आयुष्यात अंधकार घेऊन आला.

तरूणाने मेहनत करून एक वॅगनॉर कार घेतली. नवी कार आल्याने मित्रांनी बराच आग्रह केल्यानंतर तो तरूण मित्रांसह कारमधून फेरी मारण्यास बाहेर गेला. पाच मित्र निघाले होते. फेरफटका मारून परतत असताना दाट धुक्यामुळे पुढचं काही नीट न दिसल्याने त्यांची कार रामगंगा नदीवर बांधलेल्या बॅरेजचे रेलिंग तोडून खाली कोसळली.

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकच जण बचावला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं आणि वेगाने जाणारी ती कार नियंत्रणाबाहेर गेला आणि पाण्यात पडली. कारच्या खिडक्या उघडता न आल्याने आत बसलेल्या चार तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. .

पण कारमधील एक तरूण कसाबसा काच फोडून बाहेर आला. आणि कारच्या वरती उभा राहून आरडाओरडा करू लागला. त्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिस आल्यावर इतरांनाही वाचवायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. कारमधील दोन प्रवासी सिकंदर (20) आणि महरूफ (28) हे नूरपूर छिबरी येथील गावप्रमुख रऊफ अहमद यांचा मुलगा आहेत. त्यांच्यासोबत खुर्शीद (३८), अब्दुल रशीद (२३) आणि फैसल (२२) हे त्याच गावातील तीन तरुण होते. या अपघातात सिकंदर बचावला आहे, बाकी चौघांचाही मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...