spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्र हादरलं! बहिणीच्या 'लव्ह मॅरेज' ला मदत करणाऱ्या तरुणाला चार वेळा बोलेरो...

महाराष्ट्र हादरलं! बहिणीच्या ‘लव्ह मॅरेज’ ला मदत करणाऱ्या तरुणाला चार वेळा बोलेरो खाली चिरडलं, सरफिऱ्या भावंडाचा ‘भयंकर’ प्रताप घडला तरी कुठे?

spot_img

Maharashtra Crime: प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या बहिणीला मदत केल्याच्या रागातून दोघा सरफिऱ्या भावंडानी तरुणाच्या डोक्यावर चार वेळा बोलेरो घालत काटा काढल्याचा भयंकर प्रकार महाराष्ट्रात घडला. पवन शिवराम लोढे (वय २४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे अशी संशयित आरोपीची नावे आहे.

अधिक माहिती अशी:चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना संभाजीनगरातील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर घडली. मृत पवन लोढेच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता.

बहिणीच्या लव्ह मॅरेजला पवनने मदत केल्याचा राग सरफिऱ्या भावंडाच्या डोक्यात टकटक करत होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो घालत निर्घृण हत्या केली हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते. घरात लग्नाची तयारी केली जात होती. ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते, त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याने मृत तरुणाच्या कुटंबीयांनी टाहो फोडला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...