spot_img
ब्रेकिंगAhmednagar: ‘काळा’ कारभार!! ‘कॅफे‘ वर धाड

Ahmednagar: ‘काळा’ कारभार!! ‘कॅफे‘ वर धाड

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर शहरातील कॅफेंवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापेमारी केली. कॉलेजच्या तरुण-तरुणींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेंचालकांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १७) सायंकाळी सदरची कारवाई करण्यात आली.

कॅफेवर पथकाने छापा टाकला असता तरुण-तरुणी अश्लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले. कॅफेचा मालक अबिनाश विलास ताठे (रा. पंपीग स्टेशन रस्ता, साबोडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पथकाने पाइपलाइन रस्त्यावरील लव्हबर्ड्स कॅफेंवर देखील छापा टाकला टाकला असता तेथे तरुण-तरुणी अश्लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले असून कॅफे चालक ऋषिकेश सखाराम निर्मळ (रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...