Chandigarh election:चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत ‘सर्वोच्च’ न्यायालयाने आदेश काढत आप-काँग्रेसच्या उमेदवाराला महापौर म्हणून घोषित करत भाजप उमेदवाराचा विजय रद्द केला आहे.
चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणावर मंगळवारी दि २० फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारबद्दल सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढत अधिकारी खोटे बोलल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश दिले असून महापौर निवडणुकीत जी ८ मते अवैध ठरली होती, ती मते देखील वैध ठरवली जाणार आहेत. असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.