spot_img
देशराज्यात रामलल्लाचा जयघोष! भाजपाची विशेष तयारी, 'असा' असणार ७ दिवसीय सोहळा

राज्यात रामलल्लाचा जयघोष! भाजपाची विशेष तयारी, ‘असा’ असणार ७ दिवसीय सोहळा

spot_img

अयोध्या | वृत्तसंस्था-
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या संपूर्ण भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिरातीय जयघोष राज्यभरात दुमदुमणार आहे. भाजपने या सोहळ्यासाठी विशेष तयारी केली आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात ७ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भाजपची विशेष तयारी

१५ जानेवारी ते २२ जानेवारीला हे आयोजन करण्यात येणार असन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमांच उद्घाटन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील भाजप आमदार तसेच पदाधिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे.

राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची मोठी फ्रेम, राम मंदिराची प्रतिकृती आणि रोषणाई करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया, अरुण गोविल यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.

अयोध्येतील भव्य दिव्य सोहळ्यासाठीकसा असणार ७ दिवसीय सोहळा?

१७ जानेवारीला या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे.
१६ जानेवारीला सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
१७ जानेवारीला संध्याकाळीअलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांचा भजनाचा कार्यक्रम असेल.
१८ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
२० जानेवारीला कार्यक्रमात रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
२१ जानेवारीला कवी मनोज शुला यांचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
२२ जानेवारीला पद्मश्री सुरेश वाडकर यांचे देखील कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण भाजपच्या सोशल मीडियावरून केले जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...