spot_img
अहमदनगरAhmednagar: जलजीवन योजनेतील पाण्याची टाकी चोरीला, ग्रामस्थांनी केला 'धक्कादायक' आरोप

Ahmednagar: जलजीवन योजनेतील पाण्याची टाकी चोरीला, ग्रामस्थांनी केला ‘धक्कादायक’ आरोप

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या जलजीवन योजनेतील भ्रष्ट कारभाराचे अनेक किस्से चर्चेत आहेत.

यातच आता याच योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाल्याचे दाखवून त्यापोटी लाखो रुपयांचे बिल संबंधीत ठेकेदाराला देण्याचा प्रताप जिल्हा परिषदेने केला आहे. वडगाव सावताळ येथील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून संबंधीतांवर गुन्हे दाखल न केल्यास जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी वडगाव सावताळ येथे जलजीवन योजनेतून पाण्याच्या टाया आणि जलवाहिनी असे काम मंजूर होऊन त्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. योजनेच्या कामासाठी ठेकेदारही नियुक्त झाला. मात्र, सदरचे काम त्या ठेकेदाराने गावच्या सरपंचाला दिले असून सरपंचच ठेकेदार झाल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. सदरच्या कामाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात तक्रार झाल्यानंतर या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

अधिकारी आणि गावकर्‍यांनी केलेेल्या संयुक्त चौकशीत गावातील साळुंके वस्ती येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम झाल्याचे दाखवून त्यापोटी संबंधीत ठेकेदाराला बील देखील अदा करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तीवर पाण्याच्या टाकीचे बांधकामच आढळून आले नाही. वस्तीवरील लोकांनाही ही टाकी सापडत नसल्याने टाकीच चोरीला गेली असल्याचे वास्तव समोर आले. आता चोरीला गेलेली ही टाकी जिल्हा परिषद प्रशासन सापडून देणार आहे काय असा सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. याबाबत दखल न घेतल्यास उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...