spot_img
ब्रेकिंगविधानसभेसाठी भाजपाचा फॉर्म्युला ठरला! 'बड्या' नेत्यांनी दिली मोठी माहिती..

विधानसभेसाठी भाजपाचा फॉर्म्युला ठरला! ‘बड्या’ नेत्यांनी दिली मोठी माहिती..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकींचे सत्रही सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेची रणनिती आखण्यात आली.

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार झाली. भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला भूपेंद्र यादव, विनोद तावडे उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप, जागांची निवड यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, त्याबद्दल माहिती दिली.

राज्यात भाजपचे जिल्हा विस्तारित कार्यकारी अधिवेशन लवकरच पार पडले. आगामी निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक विधानसभा निहाय अधिवेशनही पार पडले. राज्यातील २८८ जागांवर, मंडल युनिटवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर योजना सुरु केल्या जातील. येत्या १५ दिवसात हा कार्यक्रम नियोजित करण्यात येईल, असे आशिष शेलार यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...