spot_img
अहमदनगरभाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

spot_img

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून कौतुक
अहमदनगर / नगर सह्याद्री –
मागील पाच वर्षात लोकसभा मतदार संघात चेहरा मोहरा बदण्याचा प्रयत्न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य मानसापर्यंत पोहचविण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न खुप महत्वपुर्ण ठरल्याचे गौरवोद्गार माजी मंत्र तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी काढले.

महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या निवडणुक प्रचारार्थ बाबळे वाडी, वरशिंदे, ताहाराबाद, गाढकवाडी, म्हैसगाव, कोळेवाडी, शेरीचिखलठाण, दरडगावथडी या गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने मागील १० वर्षात घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन, यावेळेस पुन्हा नरेंद्र मादी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले आहे.

लोकसभेचे खासदार डॉ. डॉ. सुजय विखे पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर नगरकरांच्या मनात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण आहे. जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगारासाठी नगर तालूका तसेच श्रिगोंदा येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी जाग उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. यामुळे येणाऱ्या उद्योगांमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असा विश्वास माजी मंत्री कर्डिले यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर मतदारसंघांतील जनतेने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. विखे पाटील यांच्या विजयामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करून या विभागाच्या विकासासाठी पुन्हा एकदा महायुतीला आवाहन माजी मंत्री कर्डिले यांनी केले.

लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा : डॉ. सुजय विखे पाटील

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या ५ वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या ५ वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या ५ वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या ५ वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ. विखे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे महायुतीच्या काळात झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला.येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरूणांना कामासाठी बाहेर जावे लागणार नाही यासाठी आपले विशेष प्रयत्न असतील. त्यासाठी तीन एमआयडीसीची कामे तयार असून लवकरत त्या सुरू केल्या जातील. त्याचबरोबर शेतकऱ्यासाठी बीयाण्यापासून बाजारपेढापर्यंत सेवा सुविधा निर्माण करण्यासा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान मोदींच्या हमीच्या जोरावर जिल्हा सुभलाम सुफलाम करणार असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar News : शाळेची घंटा वाजली! कुठे रडारड, कुठे पळापळ; पहिल्या दिवशी कुठे काय घडलं पहा…

शाळांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar News : दोन महिन्यांची सुट्टी संपून...

काँग्रेसकडून २८८ जागा लढण्याची तयारी, पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ…

भंडारा:नगर सह्याद्री लोकसभा निवडणुका संपताच राज्यात आता सर्वच पक्षांन विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या...

काँग्रेसच्या महिला खासदाराचा अशोक चव्हाणांना सल्ला..म्हणाले..

  मुंबई : नगर सह्याद्री राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश...

शिंदे गटाच्या दोन नेत्यांचं मोठं विधान; भाजपला इशारा ?

बई:नगर सह्याद्री मोठा भाऊ छोटा भाऊवरून महाविकास आघाडीतील वाद थांबलेला असतानाच आता या वादाने महायुतीत...