spot_img
ब्रेकिंगठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजेच भाजप! यांचा 'महायुतीला' खोचक टोला

ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजेच भाजप! यांचा ‘महायुतीला’ खोचक टोला

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
कोणी कुठे जावे हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपकडे मात्र स्वतःचे नेते शिल्लक राहिलेले नाहीत. फडणवीसांनी एक एक करून त्यांचे सर्व नेते संपवले आहेत. त्यामुळे भाजपला नेते आयात करावे लागत आहेत. ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजेच भाजप..! असा खोचक टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

सुषमा अंधारे नेमकं म्हणाल्या काय?
उद्धव ठाकरे यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मोदी-शाह मुंबईत येत होते. आता यांना दिल्लीला जावे लागत आहे,आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत, लोकसभा जागाहून कुवत ठरवावी का? फुटीरतावादी शिवसेनेला जास्त जागा मिळणार नाही.

तसेच पवारसाहेब कुठेही उभे राहिले तरी निवडूनच येणार आहे. त्यांचा विजय सदासर्वकाळ आहे. महाविकास आघाडीतील ते ज्येष्ठ नेते आहेत. पवारांनी पुण्यातून लढण्याला काहीच हरकत नाही. परंतु, हे सर्वथा तेच ठरवलीत. कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सुचवावे तेवढे आम्ही मोठे नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर)...

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...