spot_img
अहमदनगरसाखरेचा गोडवाला विरोधकांचे कडवे बोल! खासदार विखे स्पष्टच म्हणाले, विरोधकांना..

साखरेचा गोडवाला विरोधकांचे कडवे बोल! खासदार विखे स्पष्टच म्हणाले, विरोधकांना..

spot_img

Politics News: मतदार संघातील मतदाराची दिवाळी गोड करण्याचा निर्णय महसूल तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपिस्थत साखर वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला. यावेळी खासदार विखे पाटील यांनी विरोधकांच्या टिकेला तिखट शब्दात प्रतीउत्तर दिले आहे.

शिर्डी मतदार संघातील साठ हजार कटुबांला पाच किलो साखर भेट देण्याचा निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. त्यापूर्वी शिर्डी मतदार संघातील गणेश कारखान्यातील सभासदांना दहा किलो साखर मोफत भेट देण्याचा निर्णय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या यूतीने घेतला. दोन्ही हि नेत्यांनी मतदार संघातील नेत्याची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. शिर्डी मतदार संघातील मतदार संघाला पाच किलो साखर वाटपाचा शुभारंभ खासदार विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

खासदार विखे पाटील म्हणाले, विखे परिवाराच्या निमंत्रणाची दखल घेऊन विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी मतदार मतदार संघात आले. विखे परिवार मतदारसंघातील जनते सोबत राहत सुख आणि दुःख सोसत असते. कोविड काळात किराणा किटचे वाटप तसेच शाळकरी मुलांना जेवणाचे डबे व मंत्रिपद मिळाल्यानंतर घरोघरी पेढे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी निवडणूक नव्हती.

पुढे बोलतांना खासदार विखे पाटील म्हणाले, निवडणूकीचा आणि जनतेला साखर मोफत देण्याचा काहीही संबंध नाही. एखाद्या निवडणुकीने जागे होणारे आम्ही नाहीत. विरोधकांच्या टीकेला जनते समोर उत्तर न देता योग्य वेळी विरोधकांच्या घराजवळ जाऊन बोलेन, असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...