spot_img
अहमदनगरनगर अर्बन बँके संदर्भात मोठी अपडेट; 'या' तीन शाखा..

नगर अर्बन बँके संदर्भात मोठी अपडेट; ‘या’ तीन शाखा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आणखी तीन शाखा ०८ नोव्हेंबर पासून बंद करण्यात येणार आहेत. दैनंदिन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे व्यवसायिक गणेश गायकवाड यांनी दिली.

बंद होणाऱ्या शाखांमध्ये बालमटाकळी, वांबोरी व कोल्हार भगवतीपुर या तीन शाखांचा समावेश असून बालमटाकळी शाखेचे कामकाज शेवगाव शाखेतून, वांबोरी शाखेचे कामकाज नगर मुख्य शाखेतून तर कोल्हार भगवतीपुर शाखेचे कामकाज बेलापूर शाखेतून होणार आहे. या तीनही शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत.

बंद होणाऱ्या शाखांमधील खातेदार लॉकर धारकांनी आपल्या लॉकर मधील मौल्यवान ऐवज / वस्तू काढून घेऊन लॉकरच्या चाव्या बँक प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात असे आवाहन देखील बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.यापूर्वी भाडेतत्त्वावरील कार्यालय असलेल्या बँकेच्या 13 शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत.

बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून डी आय सी जी सी व केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार व आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व ठेवीदारांनी केवायसीची पूर्तता करून आपले क्लेम फॉर्म नजीकच्या शाखेमध्ये लवकरात लवकर भरून द्यावेत असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...