पारनेर । नगर सहयाद्री
तालुक्यातील निघोज येथील जत्रा हॉटेलवर झालेल्या हल्ल्यातील तीसरा आरोपीला पोलिसांनी जेरबंद केल असुन चार दिवसाची पोलीस कोठडी
सुनावली आहे.चौदा दिवसांपूर्वी निघोज येथील जत्रा हॉटेलवर हल्ला करुन हॉटेलचे मालक प्रविण भाऊ भुकन यांना गंभीर जखमी केले होते. यातील पाच आरोपींपैकी विशाल पठारे, शंकर पठारे याला आठ दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. तसेच तीसरा आरोपी आदिनाथ पठारेला शुक्रवार दि.१२ रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
निघोज येथील व्यवसायीकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन तसेच ग्रामस्थांनी निषेध सभा घेऊन या हल्ल्याचा निषेध केला होता तसेच या निषेध सभेत सर्वपक्षीय पुढार्यांनी व ग्रामस्थांनी या खंडणी बहादरांना मोक्का कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत संत सावता माळी समाजाचे नगर जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी व माजी उपसभापती खंडू भुकन यांनी या आरोपींवर मोक्का कारवाई करावी हा प्रस्ताव मांडला होता.
ग्रामसभेत हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करुण या ठरावाच्या प्रती भुकन व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत. तसेच लवकरच याचा पाठपुरावा करण्यासाठी भुकन व त्यांच्या सहकार्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाने भेटणार असून प्रविण भुकन यांच्या हल्लेखोरांना कडक शिक्षा करण्याची मागणी तसेच या सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
पोलीसांपुढे मोठे आव्हान
या हल्ल्याचे पडसाद पारनेर तालुक्यात सर्वत्र उमटले आहे, धोंड्या जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याने पुणे जिल्ह्यातील गुन्हे केले आहे. पावणेतीन कोटींच्या बँक दरोड्यातही त्याचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. तसेच ईतर गुन्हेही त्याच्या नावावर आहे. निघोज परिसरात दहशत निर्माण करुन व्यवसायीकांकडून हात उसणे पैसे घेऊन दहशत निर्माण करुण पैसे बुडवणे हा त्याच्या टोळीचा प्रमुख धंदा बनला असुन धोंड्या जाधव तसेच त्याचा साथीदार सोन्या उर्फ प्रथमेश सोनवणे हे अद्यापही फरार असल्याने पोलीसांपुढे मोठे आव्हान उभे आहे.
व्यापारी असोसिएशन सतर्क
व्यावसायीक व व्यापारी यांची एकी ठेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विरोध करुण त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी यासाठी संघटीत होण्याची गरज लक्षात घेता व्यापारी असोसिएशनचे नूतनीकरण करण्यात येणार असून याबाबत बैठकीत प्रत्येक व्यवसायाचा सर्व्हे करुण संघटन भक्कमपणे करण्यासाठी नुकतीच एक बैठक घेण्यात आली. निघोज आणी परिसरात छोट्या मोठ्या गुन्हेगारांचे साम्राज्य वाढत असून याचा फटका व्यापारी व व्यावसायिक यांना बसू नये यासाठी व्यापारी असोसिएशन सतर्क झाली आहे.