spot_img
ब्रेकिंगIAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; 'सर्वोच्च न्यायालयाने जामीन..'

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे.

उच्च न्यायालयाने अटकपूर्वी जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात तिला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

२०२२ मधील नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी, दिव्यांग आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासह इतर आरोप खेडकरवर आहेत.न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर हिला फसवणूक प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

दिल्ली पोलिसांच्या बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध दर्शवला. त्या तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत पोलिसांनी तिच्या जामीनाला विरोध केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...

पाऊस आला.. कांदा झाकला.. तरी पण भिजला..; जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!

सुपा | नगर सह्याद्री गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवार...