spot_img
महाराष्ट्रमोठी बातमी ! संसदेत घुसखोरी करणाऱ्यांकडे होते अनेक प्लॅन, संसदेत गोंधळ घालण्यापासून...

मोठी बातमी ! संसदेत घुसखोरी करणाऱ्यांकडे होते अनेक प्लॅन, संसदेत गोंधळ घालण्यापासून तर राजस्थानमध्ये अज्ञातवासात जाण्यापर्यंत…पहा..

spot_img

नगरसहयाद्री / दिल्ली
संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरण झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातील तिघांना पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेतले होते. परंतु आता या प्रकरणी नवंनवीन खुलासे समोर येत आहेत. या सर्व घटनेचा मास्टरमाइंड मुख्य आरोपी ललित झा याने गुरूवारी रात्री पोलीस ठाण्यात सरेंडर केले. त्यानंतर काही घटनांचा उलगडा झाला.

* प्लॅन B
ललितने सांगितले की, घुसखोरीचा मुख्य प्लॅन फसला तर त्यांच्याकडे प्लॅन B देखील होता. झा याने सांगितल्यानुसार काही कारणास्तव प्लॅन ए नुसार, नीलम आणि अमोल यांना संसद भवनाजवळ जायचं होतं, जर ते त्यात अयशस्वी झाले तर महेश आणि कैलाश दुसर्‍या बाजूने संसदेकडे जातील आणि नंतर संसदेसमोर स्मोक क्रॅकर्सचा वापर करत घोषणाबाजी करतील.

महेश आणि कैलाश गुरुग्राममध्ये विशाल शर्मा उर्फ ​​विक्कीच्या घरी पोहोचू शकले नाहीत, जिथे संपूर्ण ग्रुप राहत होता. त्यामुळे अमोल आणि नीलम यांना संसदेबाहेरील कामकाज कोणत्याही किंमतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 2001 च्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली, पिवळा स्प्रे फवारला आणि घोषणाबाजी केली, परंतु नंतर त्यांना पकडण्यात आलं.

खासदार आणि सुरक्षा दलांनी त्यांना पकडलं त्याच वेळी अमोल आणि नीलम यांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत निषेध केला. आरोपींच्या संपूर्ण गटाने प्लॅन A यशस्वी केला. या घटनेनंतर ललितने लपण्याचा कटही रचला होता. या

योजनेनुसार ललितला राजस्थानमध्ये अज्ञातवासात जाण्यास मदत करण्याची जबाबदारी महेशवर देण्यात आली होती.
महेशने त्याचे ओळखपत्र वापरून ललितच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि ललित, महेश आणि कैलाश सतत माहिती गोळा करत होते. मात्र, ललित आणि महेश यांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाणे गाठून सरेंडर केलं. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...