spot_img
देशमोठी बातमी : काँग्रेसच्या ५ खासदारांचे निलंबन, पहा नेमके काय घडले

मोठी बातमी : काँग्रेसच्या ५ खासदारांचे निलंबन, पहा नेमके काय घडले

spot_img

नवी दिल्ली / नगरसह्याद्री : महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आली आहे. काँग्रेसच्या लोकसभेच्या पाच खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित केले गेले आहे.

सभागृहात अनियमित वर्तन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी निलंबनासाठी प्रस्ताव मांडला होता. काँग्रेसचे खासदार टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस या पाच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

संसदेत काल जो प्रकार झाला त्यावरून त्यांनी गोंधळ घातला होता. संसदेत काल घडलेल्या घटनेवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज देखील दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले गेले होते.

दरम्यान, संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठा गोंधळ झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संसद परिसरात मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची सुरक्षा दल कसून तपासणी करत आहे.

इतकेच नाही तर बुधवारी लोकसभा सचिवालयाने खासदारांना नवीन इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची ‘स्मार्ट कार्ड’ तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....