spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे यांच्या...

मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे यांच्या सोबत गुप्त बैठक

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली असून राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. भाजपने काल ९९ उमेदवारांची घोषणा करुन सरशी घेतली तर महाविकास आघाडीत काही जागांवर तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं मनसेने जाहीर केलेलं असतानाच महायुतीत पुन्हा एकदा ‘बिनशर्त’ पाठिंब्यावर चर्चा झाली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता. ज्यानंतर आता निवडणुकीच्या माहोलात भूमिका बदलणार असून, महायुती मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यात मुंबईतील एका हॉटेलमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन तास चाललेल्या चर्चेत मुंबईतील शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबतही चर्चा झाली आहे. त्यामुळे महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी रात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून मुंबईत आले. रात्री १२ वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला. मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या तीन नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले. शनिवारी मध्यरात्री शिंदे फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये याच धर्तीवर जवळपास २ तास चर्चा झाली असून, आता खरेच लोकसभेच्या ‘बिनशर्त’ची विधानसभेला परतफेड? होणार का, महायुती हा निर्णय घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उमेदवार ठरविण्यात खा. नीलेश लंकेच किंगमेकर!

सारिपाट / शिवाजी शिर्के:- लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश...

कृषिनाथ कारखान्याने ऊस उत्पादकांना न्याय दिला; पद्मश्री पवार

खा. नीलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन...

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा...

अल्पवयीन मुलावर धारदार शस्राने सपासप वार!; बारातोंटी कारंजा जवळ नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तिघांनी अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार वस्तूने वार करून त्याला...