मुंबई / नगर सह्याद्री : राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा वसुलीबहाद्दर आहे असा आरोप करत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर अनेक मोठे घणाघात फेसबुक लाईव्ह करून मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहेत.
त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही कामगारांसह अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेलो. या माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काचं काम मिळावं. या लोकांसाठी मी भांडत होतो. परंतु त्यांचा विनय अग्रवाल नावाचा मित्र होता. अमित ठाकरे, राज ठाकरे मला मारायचे तर जीवे मारून टाका पण मी सोडणार नाही.
मराठी मराठी करायचे आणि मराठीच्या नावावर मोगलाई करणारे हे थोतांड ठाकरे आहेत. मराठी माणसाचे कैवारी नसून हे व्यापाऱ्यांचे दलाल आहेत. या फेसबुक लाईव्हनंतर माझा खूनदेखील होईल. पण गरिबांना न्याय मिळेपर्यंत मी सोडणार नाही. अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी मला बेदम मारलं.
कसाबसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणले. या लोकांनी मला वाचवलं. राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे. हे नेमकं काय आहे? मागील २० वर्ष मी राज ठाकरेंसोबत घालवली. ते दाखवतात एक आणि करतात एक. राज ठाकरेंचा पक्ष फक्त खंडणीखोर आहे असं त्यांनी म्हटलं आहे, त्यानंतर मात्र खळबळ उडाली आहे.