spot_img
राजकारणनिवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी ! केजरीवाल यांना कोर्टाचा झटका, अटकेला स्थगिती देण्यास...

निवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी ! केजरीवाल यांना कोर्टाचा झटका, अटकेला स्थगिती देण्यास नकार, पहा आज काय घडलं,,,

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मद्य धोरण प्रकरणात मनी लाँडिग घोटाळा आरोपात दिल्ली हायकोर्टाने सीएम केजरीवाल यांच्या याचिकेवर दोन आठवड्यात जबाब देण्यास सांगितले आहे. दिल्ली हायकोर्टात पुढची सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे.

आज मद्य धोरण प्रकरणात दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. आज ईडीने कोर्टात कागदपत्रे जमा केली. ईडीकडून अतिरिक्त सॉलिसीटर एस व्ही राजू यांनी कोर्टात कागदपत्रे जमा केली, आणि म्हटले की, आम्ही कोर्टाच्या सांगण्यावरुन कागदपत्रे देत आहोत, याचिकाकर्ते याची मागणी करु नका.

सीएम केजरीवाल यांनी ईडीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. केजरीवाल यांच्याकडून वकील अभिषेक सिंघवी उपस्थित होते, सिंघवी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर अटक करा, निवडणुका तरी लढवण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला एवढेच समाधान मिळणार असेल तर जूनमध्ये अटक करा. कमीत कमी निवडणुका लढवण्यापर्यंत दंडात्मक कारवाईपासून सुरक्षा मिळाली पाहिजे, मला निवडणूक लढायला द्यायला पाहिजे, असंही केजरीवाल यांच्याकडून वकील सिंघवी म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने आता पर्यंत आठवेळा समन्स पाठवण्यात आले आहेत. केजरीवाल अजूनही चौकशीसाठी हजर झालेले नाही. दरम्यान, आप’कडून ईडीवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्यात येणार असल्याचा आरोप आपने केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजपच्या ‘बड्या’ नेत्याच्या सभेत राडा! कुठे घडाला प्रकार?

नांदेड | नगर सह्याद्री काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मराठा समजााच्या...

रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवार नेमकं म्हणाले काय, पहा..

बारामती | नगर सह्याद्री वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात...

‘नगरकरांचे घर टू घर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन होणार’

अहमदनगर | नगर सह्याद्री- शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १.४० लाख...

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार विखेंची प्रचार सभेत मोठी ग्वाही, वाचा सविस्तर…

अहमदनगर | नगर सह्याद्री मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला...