spot_img
देशमोठी बातमी ! धोनी पायउतार, ऋतुराज गायकवाड चेन्नईचा नवा कर्णधार

मोठी बातमी ! धोनी पायउतार, ऋतुराज गायकवाड चेन्नईचा नवा कर्णधार

spot_img

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी आली आहे. महेंद्रसिंग धोनी याने चेन्नईचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आता चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बनवण्यात आले आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली असल्याने आगामी आयपीएलच्या तोंडावर धोनीच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी आली आहे.

22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 17व्या हंगामाचा पहिला सामना शुक्रवारी सीएसकेचा आरसीबीविरुद्ध होणार आहे. सीएसकेला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंग धोनी आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनीने ही जबाबदारी सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदात बदल केले होते.

धोनीच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले. मात्र, तो ही जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही. त्यामुळे त्याने हंगामाच्या मध्यातच संघ सोडला आणि कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळली. गेल्या मोसमात संघाने पाचवे विजेतेपद पटकावले. आयपीएलने आज सर्व कर्णधार आणि ट्रॉफीसह फोटो ट्विटवर शेअर केला. या फोटोत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ऐवजी फोटोसेशनला ऋतुराज गायकवाडने उपस्थिती लावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...