spot_img
अहमदनगरमोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज,...

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

spot_img

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी

८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा

पारनेर / नगर सह्याद्री – पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील १८ बुथवरील ईव्हिएम मशिनमधील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करणारा अर्ज महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे गुरूवारी सुपूर्द करण्यात आला. या पडताळणीसाठी ४७ हजार ६०० रूपयांप्रमाणे १८ बुथसाठी आवष्यक असलेले ८ लाख ४९ हजार ६०० रूपये इतके शुल्क लंके यांच्या वतीने शासनाच्या कोषागारात जमा करण्यात आले आहे.

गेल्या २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली. पारनेर-नगर मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली. त्यावेळी महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशिनाथ दाते व महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढत झाली. काशिनाथ दाते यांनी बाजी मारली. मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हिएमच मशिनसंदर्भात शंका घेण्यात येत होत्या. खा. नीलेश लंके यांनीही दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ईव्हिएम मशिनवर शंका उपस्थित करत पोष्टल मतदानाचा जो कल असतो तोच कल मतदान यंत्रातील मतांमध्येही असतो असा अनुभव असताना यंदाच्या निवडणूकीत हा कल कसा बदलला गेला असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभुमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीने ठराविक मतदान केंद्रावरील मतांची फेर मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

४५ दिवसांनी होणार पडताळणी
लोकसभा, विधानसभा निवडणूकीतील क्र.२ व क्र.३ वरील पराभूत उमेदवारांना ईव्हिएम पडताळणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याची मागणी करता येते. त्यानुसार राणी लंके यांच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली. निकालानंतर ४५ दिवसांनी ही पडताळणी करण्यात येणार आहे.

या बुथवरील मतांची होणार पडताळणी
क्र.२ नागापुरवाडी, क्र. २८ वनकुटे, क्र.३० पठारवाडी, क्र. ३८ देहरे, क्र.५० सुतारवाडी, क्र. ९२ भाळवणी, क्र.९४ भाळवणी, क्र.९५ भाळवणी, क्र.११४ वडगांव गुप्ता, क्र.११५ निंबळक, क्र.११७ निंबळक, क्र.२६५ सुपा, क्र. २६७ सुपा, क्र.२६८ सुपा, क्र.२९३ वाळवणे, क्र. ३१० निघोज, क्र ३१३, निघोज, क्र. ३५९ वाडेगव्हाण.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...

तनपुरे यांना पराभव अमान्य! इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार...