spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! नगर- कल्याण महामार्गावर अपघात, आठ ठार

मोठी बातमी! नगर- कल्याण महामार्गावर अपघात, आठ ठार

spot_img

पुणे। नगर सह्याद्री

नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मृतांमध्ये दोन मुले, एक महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.

रविवारी रात्री जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावा जवळील अंजीराची बाग येथे ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यात पिकअप आणि रिक्षामधील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघात पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. गणेश मस्करे ( वय ३०), कोमल मस्करे ( वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समोर आली नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार ठार

पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारात 8.30 वाजेच्या सुमारास टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे.अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे.

मयतांमध्ये दोन पुरुष, एक महिला व 2 वर्षाच्या लहान बाळाचा समावेश आहे.सुनिल दिनकर धारणकर (वय 65, रा. सुभाष रोड, अकोले), आशा धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), अभय विसाळ (रा. अकोले) अशी मयतांची नावे आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम...

मोठी बातमी ! मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, मनोज जरांगेंकडून आज मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे...

रजनीकांत 24 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये धमाका करणार ! ‘या’ सिनेमात झळकणार

मुंबई / नगर सहयाद्री : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हा दिग्गज अभिनेता हा त्याच्या वैविध्यपूर्ण...

अभिनेत्री जया प्रदा का आहे फरार? नेमक्या कोणत्या प्रकरणात अडकल्यात? पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : अभिनेत्री जया प्रदा हे चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव. त्यांनी...