spot_img
अहमदनगरपारनेरकरांना 'मोठे' गिफ्ट!! 'या' रस्ताच्या कामांसाठी ईतक्या' कोटींची मान्यता

पारनेरकरांना ‘मोठे’ गिफ्ट!! ‘या’ रस्ताच्या कामांसाठी ईतक्या’ कोटींची मान्यता

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (संशोधन व विकास) अंतर्गत विविध सात गावातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध होणार असुन ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. कान्हुर पठार ते लोंढे मळा २ किमी. १५३.२० लक्ष, कान्हुर पठार ते रानमळा २ किमी. २४५.२८ लक्ष, देवीभोयरे ते सरडे वस्ती १ किमी. १८३.१३ लक्ष, वडझिरे ते निघुटमळा १.२ किमी. ११९.३४ लक्ष, गांजीभोयरे ते पांढरेवस्ती रस्ता १.४ किमी. १४२.३९ लक्ष, कुरुंद ते नरोडेवस्ती रस्ता १.४ किमी. १२७.१३ लक्ष तर पानोली ते काळोखे मळा १ किमी. १०३.७० लक्ष अशा एकुण सहा गावांतील सात ठिकाणच्या १०७४.१७ लक्ष रुपये प्रशासकीय रक्कम मंजुर असणार्‍या १० किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना नुकतीच प्रसासकीय मान्यता मिळाली असल्याचेही विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कोरडे म्हणाले की, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात घेऊन कामांच्या मंजुरीसाठी प्राधान्याने मागणी करण्यात आलेली होती. ही मागणी केल्यानंतर संबंधित कामांना तत्वतः मान्यताही मिळालेली होती. तत्वतः मान्यता मिळतेवेळी मंजुरीची रक्कम अवघी साडेसात कोटी इत्कीच होती परंतु प्रत्यक्ष पाहणी करता देवीभोयरे येथील पिंपळडोह ओढ्यावर, कान्हूर पठार येथील रानमळा रस्त्यावर पूल करणे तर गांजीभोयरे येथील पांढरेवस्तीकडे जाणारा रस्ता आदी कामांवर निधी वाढविणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक नागरिकांच्या आवश्यक गरजा लक्षात घेवून त्याप्रमाणे पुन्हा एकदा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला होता.

सबंधित कामांसाठी आवश्यक असणार्‍या वाढीव निधीच्या पूर्ततेसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश येवून १३ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे या भागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्ताकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरवात होणार असुन भारतीय जनता पार्टीकडे असलेल्या सत्तेच्या माध्यमातून जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावणारे तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपणास अहमदनगर दक्षिणेचे विद्यमान खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह विविध श्रेष्ठींची मदत होत असते. तसेच उर्वरीत कामांच्या मंजुरीसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.

रस्त्यांसाठी ऐतिहासिक निधी
जनसामान्यांचे नेतृत्व करत असताना आपण पक्षीय धोरणांनुसार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगत, राजकारणविरहीत सर्वसमावेशक विकासात्मक धोरण राबवत नागरीकांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याने शासनाच्या या उद्दीष्ठांपासुन पारनेर तालुका वंचित राहु नये हाच आपला व खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांचा सातत्याने प्रयत्न राहिला असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...