spot_img
अहमदनगरAhmednagar News : अहमदनगर मधील 'या' सराईत गुन्हेगार स्थाबद्धतेची कारवाई

Ahmednagar News : अहमदनगर मधील ‘या’ सराईत गुन्हेगार स्थाबद्धतेची कारवाई

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : कोपरगाव शहरातील सराईत गुन्हेगार नकुल धर्मराज ठाकरे (वय २२ वर्ष रा.शारदानगर, कोपरगाव) याच्यावर एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात अली आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार नकुल धर्मराज ठाकरे यास ताब्यात घेत नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

सराईत गुन्हेगार नकुल धर्मराज ठाकरे हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने कोपरगाव शहरात त्याच्या साथीदारांसह खुनाचा प्रयत्न करणे, दरोडयाचा प्रयत्न करणे, विनयभंग, जबरीने मालमत्ता घेण्यासाठी दुखापत करणे, खून आदींसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. नकुल ठाकरे याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी केलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या ठरत होत्या.

त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांनी एमएपीडीए कायदयान्वये प्रस्तावर तयार करुन उप विभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिला होता. या प्रस्तावाची ओला यांनी पडताळणी करत प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे दिला होता. जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रस्तावांची व सोबतच्या कागदपत्रांची पडताळणी करत स्थानबद्धतेचे आदेश काढले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सपमै बाळासाहेब मुळीक, पोहेकों विश्वास बेरड, रविंद्र पांडे, सुरेश माळी, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडवल, पोना रविंद्र कर्डीले, पोकों रणजित जाधव, बाळासाहेब गुंजाळ आदींनी केली आहे.
अहमदनगर जिल्हयातील सराईत गुन्हेगार तसेच संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या टोळीचा बिमोड करण्यासाठी त्यांच्यावर प्रचलित कायदयान्वये कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....