spot_img
अहमदनगर'शेतकर्‍यांच्या पिकासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मोठी मागणी'

‘शेतकर्‍यांच्या पिकासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मोठी मागणी’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍याची दैनीय अवस्था झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भव कोरडे पडल्या मुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. जनावरांचा चारा देखील वाळू लागला आहे. त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उभ्या पिकासाठी मुळा उजवा कालव्याच्या आवर्तनातून पाणी सोडण्याची मागणी माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.

आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव व पाथर्डीच्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राजेंद्र देशमुख, अंबादास कळमकर, सुधाकर लांडे, शहादेव खोसे, अशोक मेरड, विक्रम लोढे, राजेंद्र आढाव, रोहन साबळे, माणिकराव बुधवंत, उदय बुधवंत, जय बुधवंत, राहूल बेडके, बबन जाधव, अनंत सावंत, जगन्नाथ साबळे, गणेश खंबरे, अजय साबळे, लक्ष्मण नांगरे, चंद्रकांत निकम, गंगाधर भोसले, तुकाराम मुळे, संजय मराठे, लक्ष्मण नगरे आदी उपस्थित होते.

शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गावे मुळा उजवा कालवा शाखा कालवा क्र. २ अंतिम वितरिका व पाथर्डी शाखा कालवा यांच्या अंतिम लाभ क्षेत्रात येतात. या कालव्यावरील पाणी वापर संस्था हा अंतिम भागात आहे. या सर्व संस्था सक्षमपणे काम करत आहे. सन २०२३- २४ मध्ये अत्यल्प पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून परिसरातील विहिरी, कुंपणलिका यांना पाणी राहिले नाही. शेतकर्‍यांची पिके सर्वस्वी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.

या सर्व संस्थांना पूर्ण दाबाने व मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा जेणेकरून कुठल्याही शेतकर्‍यांचे पीक पाण्यापासून वंचित राहणार नाही व सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी पाणी वापर संस्थाचे पदाधिकार्‍यांशी संवाद ठेवावा व त्यांच्याशी विचार विनिमय करून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करावा तसेच अंतिम भागाकडून सिंचन करण्यात यावे आश्या सूचना क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात यावे व लाभ क्षेत्रातील सर्व गावात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असुन प्रत्येक गावातील ग्रामस्थ, वाड्या, वस्त्यावरील रहिवाशी यांना टँकर मार्फत पाणीपुरवठा व्हावा. लाभक्षेत्रातील नैसर्गिक प्रवाहवर छोटे-मोठे बंधारे व पाणी पुरवठे आहेत या सर्व बंधार्‍यात व पाणीपुरवठ्याचे ठिकाणी कालव्याचे पाणी देण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...