spot_img
देशBig Breaking : कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत केला,...

Big Breaking : कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत केला, सांगितले धक्कादायक वास्तव

spot_img

दिल्ली / नगर सह्याद्री : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर आंदोलक कुस्तीपाटांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी संजय सिंग अध्यक्ष असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या तिघांनी कुस्तीपाटांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. आता कुस्तीपट्टू बजरंग पुनियाने मोठा निर्णय घेतला आहे. “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे”, असे एक्स साइटवर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे.

”मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है,” असे ट्विट करून बजरंग पुनियाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बजरंग पुनियाने लिहिले की, आशा करतो की तुम्ही बरे असाल. तुम्ही देशाची सेवा करण्यात व्यग्र आहात. तरीही तुमचं लक्ष आमच्या कुस्तीकडे वळवण्याचा माझा प्रयत्न आहे.

जानेवारीत आम्ही बृजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत उपोषणाला बसलो होतो, हे तर तुम्हाला माहीत असेलच. महिला कुस्तीपटूंनी सुरू केलेल्या आंदोलनात मी पण सहभागी होतो. आश्वासनानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले, परंतु ३ महिने काहिच न झाल्याने आम्ही पुन्हा आंदोलनाला बसलो.

”आमचे ते आंदोलन ४० दिवस चालले होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करून त्रास दिला. आम्हाला केवळ आश्वासनं मिळाली. २१ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत बृजभूषणने पुन्हा महासंघावर कब्जा केला. महिला कुस्तीपटूंना असे अपमानित केले जात असताना हा पुरस्कार घेऊन मी जगू शकत नाही. त्यामुळे ही हा पुरस्कार परत करतोय ,” असेही त्याने लिहिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...