spot_img
राजकारणभुजबळांना भाजपमधून ऑफर?, गौप्यस्फोटाने मोठी खळबळ

भुजबळांना भाजपमधून ऑफर?, गौप्यस्फोटाने मोठी खळबळ

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चांगलाच गाजला आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांनी नाशिक येथे झालेल्या सभेत मोठा घणाघात केला. छगन भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना? कारण त्यांनी याआधीही अनेकदा पलटी मारली आहे असा घणाघात केला आहे.

छगन भुजबळ यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत आक्रमक वक्तव्ये असूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगल आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असेल. कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीच बोलत नाही आणि त्यांना थांबवतही नाहीत. मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का असा घाणाघातही त्यांनी केला आहे.

पोस्टर्स फाडले, जरांगेंचा शांत राहण्याचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच नाशिक येथे सभा पार पडली. या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत विविध ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले होते. याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “हा प्रकार झाला असला तरी मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे.

पोस्टर फाडल्याने काही होणार नाही. पण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे, याकडे गृहमंत्री फडणवीसांनी बघितलं पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे, हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे,” असंही जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...

शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार! केंद्र सरकार आज मोठी घोषणा करणार?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी २१व्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट...

आजचे राशी भविष्य ! आजचा दिवस कुणासाठी आहे खास?, कुणाला मिळणार यश? जाणून घ्या…

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या....

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...