spot_img
महाराष्ट्रभुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, सहा महिन्यात सरकार बदलायचंय'

भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, सहा महिन्यात सरकार बदलायचंय’

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री
शरद पवार यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला इशाराच दिला आहे. “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार”, असं शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान शरद पवारांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी 4 ते 6 महिन्यात सरकार बदलायचं आहे असा नारा दिला आहे. त्याबद्दल विचारण्यात आलं असता भुजबळांनी महायुतीला चर्चेचं गुऱ्हाळ सुरु न ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “लवकरात लवकर युतीतील पक्षांनी एकत्रित बसून तिकीट वाटपाचा निर्णय घ्यायला हवं. 70, 80 जागा, बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर जे काय असेल तर लवकर ठरवा. शरद पवार कामाला लागले आहेत. त्यांनी प्रचार सुरु केला असून, तशा प्रचाराला आपण सुरुवात करायला हवी. आपण परत तेच चर्चेचं गुऱ्हाळ सुरु ठेवलं तर अडचणी निर्माण होतील”, असा इशाराच भुजबळांनी दिला आहे.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्याप्रमाणे चालवत आहेत का? असं विचारण्यात आलं असता छगन भुजबळ म्हणाले की, “काल संध्याकाळच्या बैठकीत मी होतो. मला कुठे डावललं आहे”.

तसंच आरएसएसचं मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मधून अजित पवारांना महायुतीत कशाला घेतलं? अशी विचारणा भाजपाला केली आहे. त्यावर भुजबळ म्हणाले की, “त्यांनी अनेकांवर टीका केली आहे. काही लोकांनी तर काँग्रेसचे लोक का घेतले अशीही टीका केली आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना घेतलं आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. पण हे तुम्ही महाराष्ट्रातील सांगत आहात. मग भारतातील इतर ठिकाणी काय झालं? तिथेही तुम्हाला धक्का बसला आहे. म्हणून नितीश कुमार. चंद्राबाबू यांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करावं लागलं आहे”.

“मीदेखील राज्यसभेसाठी इच्छुक होतो. माझ्यासह आनंद परांजपे, बाबा सिद्धिकी असे अनेकजण इच्छुक होते. पण चर्चेअंती अखेर सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांनी काहीच म्हटलेलं नाही. कोअर ग्रुपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा अजित पवारांचा नसून, सर्वांचा निर्णय आहे,” असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...