पारनेर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार नीलेश लंके अशी लढत होण्याची मोठी शयता निर्माण झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून निवडणूक मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे. खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुयाचे दौरे मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुयात मोठे शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान या सोहळ्यात खासदार सुजय विखे यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास भोसले, राष्ट्रवादी युवक काँगेसचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर दिसून आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या कार्यक्रमानिमित्ताने खासदार यांनी तालुयातील जवळपास सगळ्याच पुढार्यांना एकाच व्यासपीठावर आणले होते. आमदार लंके यांना तालुयातच रोखण्यासाठी खासदार विखे यांनी आता कंबर कसली आहे. सरपंच पंकज कारखिले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत विखेंच्या माध्यमातून राळेगण थेरपाळ येथे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी दहा हजारापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अहमदनगर उपजिल्हाप्रमुख निघोज भागाचे नेते रामदास भोसले व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर हे सरपंच पंकज कारखिले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खासदार सुजय विखे यांच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे तालुयात आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण महाविकास आघाडीतील तालुयातील मोठे नेते ते समजले जातात.
अलीकडेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आळकुटी भागाचे नेते डॉ. भास्कर शिरोळे यांची सुद्धा खासदार विखे यांनी भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. तसेच पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी सुद्धा खासदार विखे यांची गुप्त भेट घेतल्याची तालुयात सुप्त चर्चा आहे. त्यामुळे आ. लंके गटातील अनेक नेते खासदार विखे यांच्या संपर्कात असल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदार विखे यांच्यासमोर उमेदवार म्हणून आमदार लंके असले तरी त्यांना तालुयात मोठे मताधिय मिळवताना कसरत करावी लागणार आहे.
राळेगण थेरपाभ येथे सरपंच पंकज कारखिले यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुजय विखे यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते सर, पारनेर नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, निघोज जिल्हा परिषद गटाचे सचिन पाटील वराळ, अण्णा हजारे यांचे माजी स्वीसहाय्यक सुरेश पठारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, आदी मातब्बर नेते यावेळी खासदार सुजय विखे यांच्या व्यासपीठावर दिसून आले. रामदास भोसले व विक्रम कळमकर यांच्या उपस्थितीने राजकीय जाणकारांच्या यावेळी भुवया उंचविल्या होत्या.