spot_img
अहमदनगर'भाळवणीचा ‘आदर्श’ राज्याला दिशादर्शक'

‘भाळवणीचा ‘आदर्श’ राज्याला दिशादर्शक’

spot_img

भाळवणी | नगर सह्याद्री
सन २०१७ पासून आदर्शगाव योजनेत निवड झालेल्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात पारनेर तालुयातील आदर्शगाव भाळवणीचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागतो. तसेच हा आदर्श राज्याला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या आदर्शगाव प्रकल्प व संकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

आदर्शगाव योजनेच्या शेवटच्या टप्प्यात गावातील ६३ महिला बचत गटांना फिरता निधी म्हणून प्रत्येक बचत गटाला २५ हजार रुपये या प्रमाणे १५ लाख ७५ लाख रुपयांच्या निधीचे वाटप पद्मश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सुमारे सहाशे ते सातशे महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लिलाबाई रोहोकले होत्या.

भाळवणी गावाची आदर्शगाव योजनेत सन २०१७ साली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पुढाकाराने व गावातील सर्व नेतेमंडळी व ग्रामस्थांच्या सहभागातून निवड झाली. गावाची आदर्शगाव योजनेत निवड झाल्यानंतर शासकिय नियमाप्रमाणे प्रथम मपाणी आडवा पाणी जिरवाफ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. या सुरुवातीच्या कामापासून ते आता ३१ मार्च २०२४ पर्यंत झालेल्या सर्व कामांचा ताळेबंद यावेळी मांडण्यात आला. सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून गावशिवारातील बांध बंदिस्ती, बंधारे, समतल चर तसेच बाजारतळ ओट्यांचे बांधकाम, काँक्रिटीकरण, स्मशानभूमीत बांधकाम व पेव्हर ब्लॉक, हागणदारी मुक्तीसाठी प्रत्येक घरात संडास व शेवटी महिला सक्षमीकरण अंतर्गत फिरत्या निधीचे वाटप उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव नवले, संभाजी रोहोकले, बाबासाहेब तरटे, बंडू रोहोकले, अशोक रोहोकले, सरपंच लीलाबाई रोहोकले, उपसरपंच आप्पासाहेब रोहोकले, रंगनाथ रोहोकले, दत्तात्रय रोहोकले, संदीप रोहोकले, शिवाजी पट्टेटर, संभाजी आमले, लक्ष्मण रोहोकले, अरुण रोहोकले, युवराज रोहोकले, तुषार रोहोकले, ग्राम कार्यकर्ता बी.वाय. रोहोकले, सतिश रोहोकले, सदाशिव रोहोकले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...

गैरव्यवहाराची तक्रार: सरपंच पतीसह चार जणांवर जीवघेणा हल्ला, कुठे घडली घटना?

जामखेड । नगर सहयाद्री:- ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल 9 ते...

द्राक्ष उत्पादकाला सात लाखांचा गंडा; नागपुरातील व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

​अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अस्मानी-सुलतानी संकटाने पिचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांनीही घेरल्याचे दिसत...

कोरठण खंडोबा देवस्थान गडावर चंपाषष्टी उत्साहात

खंडेरायावर हळदीची उधळण । गडावर भाविकांची गर्दी पारनेर । नगर सह्याद्री अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा...