spot_img
अहमदनगरAhmednagar: सावधान! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवताय? ही बातमी एकदा वाचा..

Ahmednagar: सावधान! प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती बनवताय? ही बातमी एकदा वाचा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरले जाणार्‍या पिओपी साहित्याची विल्हेवाट लावावी. असा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने गणेश मूर्ती बनवणार्‍या कारखानदारांना दिला आहे.

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याबाबत व पीओपीच्या मूर्तींबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या पत्राच्या आधारे महापालिकेने शहरातील १३० कारखानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. अहमदनगर जिल्हा गणेश मुर्तिकार संघटनेने याचा निषेध करत ही नोटीस अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

पी ओपी मूर्तीच्या उत्पादन व विक्रीवर कोणतीही बंदीनसल्याचे सरकारने विधान परिषदेत मागील वर्षी स्पष्ट केलेले आहे. तरीही चुकीचा अर्थ काढत या नोटीसा बजावण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. चुकीचा संदर्भ घेऊन शहरातील व जिल्ह्यातील कुटुंबांना बेरोजगार करू नये, असे मत संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...