spot_img
महाराष्ट्रसावधान! 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याची माहिती वाचा एका क्लिकवर..

सावधान! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान खात्याची माहिती वाचा एका क्लिकवर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे. गेल्या काही दिवसात तापमानात वाढ होत काही ठिकाणी तापमानाने ४३ अंशाचा टप्पा पार केला आहे. उष्णतेच्या लाटेसह अवकाळीचे संकट कायम आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील नागरिक सध्या या वातावरणानुळे त्रस्त असताना आता पुन्हा तापमानात वाढ होत, उष्णतेच्या लाटेमुळे चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात २९ एप्रिलपर्यंत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबईसह विदर्भात उष्णतेची लाट तीव्र असेल.

यासह अवकाळी पावसाचे संकट देखील कायम आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यापासून उत्तर तमिळनाडूपर्यंत तसेच मध्य प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, मराठवाडा आणि कर्नाटकपर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठा वाड्यात पावसाची शक्यता आहे.तर कोकणात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण उष्ण व दमट राहणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...