नगर सहयाद्री टीम-
रखरखत्या उन्हात बरेच लोक कुटुंबासह कारने लॉग रूट फिरण्याच्या तयारीत असतील. तुम्हीही असा काही प्लॅन करत असाल, तर तुमच्या गाडीची टाकी पुर्ण भरण्यापूर्वी ही बातमी तुमचे होणारे नुकसान टाळु शकते.
जेव्हा जेव्हा लोक लांब विकेंडला किंवा कुटुंब आणि मुलांसोबत सुट्टीवर जातात, तेव्हा सर्वप्रथम ते वाहनाची इंधन टाकी भरतात. जर तुम्ही उन्हाळ्यात वाहनाची इंधन टाकी भरत असाल, तर तुम्ही एक मोठी चूक करत आहात.
काय सांगता वाहन तज्ज्ञ?
उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या कारची पुर्ण टाकी भरत असाल, तर तुम्ही चूक करत आहात. वास्तविक पेट्रोल आणि डिझेलचे बाष्पीभवन लवकर होते आणि उन्हाळ्यात तापमान शिखरावर असते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनाची इंधन टाकी भरता, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या बाष्पीभवनाने तयार होणाऱ्या वायूसाठी जागा उरत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाहनातील इंधन भरता, तेव्हा 10 टक्के टाकी रिकामी ठेवावी असे वाहन तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एक चुक ठरेल घातक?
तुम्ही धूम्रपान करत असाल, तर तुमच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. धुम्रपान करणारे लोक अनेकदा कारमध्ये लायटर ठेवतात. अनेकजण परफ्यूमही ठेवतात. जर तुम्ही उन्हाळ्यात या दोन्ही गोष्टी कारमध्ये ठेवत असाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. उन्हाळ्यात कारच्या आत एअर पॅसेज नसल्याने लायटर आणि परफ्यूमच्या बाटल्या गरम होऊन फुटू शकतात, ज्यामुळे तुमच्या कारला आग लागू शकते.