spot_img
महाराष्ट्रसावधान! ‘या’ दोन नंबरवरून येणारे कॉल्स टाळा, अन्यथा…

सावधान! ‘या’ दोन नंबरवरून येणारे कॉल्स टाळा, अन्यथा…

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:-
तंत्रज्ञान जसे पुढे जात आहे तसे माणसाचे आयुष्य सोपे होत आहे. पण त्याचबरोबर, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या भामट्यांची संख्याही वाढत आहे. सर्वसामान्य लोक या भामट्यांचे बळी ठरत आहेत. ऑनलाइन सेवांचा वापर वाढल्याने या संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे.

या बातमीच्या माध्यमातून आपण तंत्रज्ञानाच्या धोक्याबद्दल आणि अशा फसवणुकीपासून कसे सावध राहावे याबद्दल जाणून घेणार आहोत. लोक कितीही सतर्क राहिले तरी स्कॅमर्स नवनवीन पर्यायांचा वापर करून लोकांची फसवणूक करतात. काही लोकांना तर अशा कॉल्समुळे कोट्यवधींचा फटका बसला आहे. लोकांचे पैसे लुटण्यासाठी घोटाळेबाज नवीन मार्ग शोधत आहेत. सरकार लोकांना या घोटाळ्यांपासून वाचवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. पण घोटाळेबाजही त्यांच्यापासून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता इंटरनेटवरून कॉल येणे सामान्य झाले आहे. त्यामुळे आता बहुतांश लोक सावध आहेत पण तरीही आता अशी एक गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे तुम्ही थोडे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सरकारने असे दोन फोन नंबर जारी केले आहेत, ज्यावरून फोन आला तर तो न उचलण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. थायलंड टेलिकॉम अथॉरिटीनुसार थायलंडमधीललोक इंटरनेट कॉल करतात ज्यांची संख्या +697 किंवा +698 ने सुरू होते.

या दोन नंबर ने सुरु होणारे फोन आले तर ते फसवणूककर्त्यांचे असल्याचे समजा. हे कॉल ट्रॅक करणे खूप कठीण आहे. त्यामुळे घोटाळेबाज या क्रमांकांचा वापर करून फसवणूक करतात. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या मदतीने ते त्यांचे लोकेशनही लपवतात. अशा परिस्थितीत या लोकांना पकडण्याची शक्यता खूपच कमी असते.

‘या’ नंबरवरून कॉल आल्यास काय करावे?
आता जर या अशा नंबरवरून कॉल आला तर काय करावे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर लोकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी सरकारने एक नवीन वेबसाइट तयार केली आहे. तिचे नाव चक्षु पोर्टल आहे. तुम्हाला फसवणूक करणारा कोणताही कॉल किंवा मेसेज आल्यास तुम्ही या वेबसाइटवर जाऊन तक्रारनोंदवू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...