spot_img
ब्रेकिंगज्ञानेश्वर साखर कारखान्याला 'बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड' जाहीर

ज्ञानेश्वर साखर कारखान्याला ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड’ जाहीर

spot_img

भेंडा / नगर सह्याद्री : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला भारतीय शुगर, कोल्हापूर या देश पातळीवर मान्यता असलेल्या संशोधन संस्थेचा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड” जाहीर झाला आहे.

भारतीय शुगर, कोल्हापुर ही मान्यता प्राप्त संशोधन संस्था असून १९७५ पासून सहकारी आणि खाजगी साखर क्षेत्रासाठी काम करते. या संस्थेतर्फे दरवर्षी साखर उद्योगात कार्यरत असणारे साखर कारखाने, अधिकारी व पदाधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वांगीण क्षेत्रात केलेले कार्य, साखर उद्‌द्योगातील अमूल्य योगदान आणि साखर उद्योगाला आघाडीवर आणण्याचा प्रयत्न याबद्दल हा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड” देण्यात येत आहे. दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...