spot_img
अहमदनगरतुरुंगात जाण्याआधी बाजीरावकडून गोरेश्वर मल्टीस्टेटचा विक्री महोत्सव!

तुरुंगात जाण्याआधी बाजीरावकडून गोरेश्वर मल्टीस्टेटचा विक्री महोत्सव!

spot_img

तुरुंगात राहून गोरेश्वर पतसंस्था पुन्हा ताब्यात देण्याचे करतोय आर्जव
पारनेर | नगर सह्याद्री
आर्थिक घोटाळे घालत गोरेश्वर पतसंस्था आणि गोरेश्वर मल्टीस्टेट या दोन्ही पतसंस्थांमधील ठेवीदारांसह सभासदांचा विश्वासघात करणारा या दोन्ही पतसंस्थांचा तत्कालीन सर्वेसर्वा बाजीराव पानमंद हा गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहे. मात्र, तुरुंगात जाण्याआधी या पठ्ठयाने गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्था विक्री केल्याची बाब समोर आली आहे. ज्यांना ही संस्था विक्री केली, त्या सर्वांना गोरेश्वर मल्टीस्टेटमध्ये संचालक म्हणून नियुक्ती देण्यात येत असल्याची फोटोच आता समोर आले आहे. बाजीराव पानमंद यांनी स्वत:च या नवनियुक्त संचालकांचा सत्कार केला हे विशेष! गोरेश्वरची विक्री प्रक्रिया आणि नवीन संचालकांचा सत्कार होताच बाजीराव पानमंद यास बेड्या पडल्या.

गोरेश्वर पतसंस्थेतील ठेवीदारांना चुना लावत राजे शिवाजी पतसंस्थेत अनधिकृत व्यवहार करताना त्यात कोट्यवधींचे घबाड खिशात घातल्याचा आरोप बाजीराव पानमंद याच्यावर आहे. लेखा परीक्षण अहवालात हे स्पष्टपणे समोर आले. याशिवाय पानमंद याने संचालकांना विश्वासात न घेता अनेक अनधिकृत गोष्टीही केल्या. त्यातून अटक झालेला पानमंद हा नाशिकच्या तुरुंगात सध्या आहे. तुरुंगात जाण्याआधी मल्टीस्टेट पतसंस्थेची त्याने विक्री केली. आता तुरुंगात असताना त्याने गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी अर्ज भरला आहे. त्याच्यासोबत त्याने त्याचे काही नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत पॅनल निवडणुकीत उतरवले आहे.

बाजीरावच्या ताब्यात ही संस्था पुन्हा द्या, या संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देऊ, असे त्याच्या समर्थकांकडून आवाहन केले जात आहे. बाजीरावची काहीच चूक नसल्याचेही हे समर्थक सांगत आहेत. मात्र, याच दरम्यान मल्टीस्टेट पतसंस्थेची सर्वांना अंधारात ठेवत बाजीरावने विक्री केल्याचे फोटोच समोर आले आणि त्या सर्वांचा बाजीरावने स्वत: सत्कार केल्याचेही समोर आल्याने बाजीराव पानमंद याचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

विक्री ज्यांना केली, त्यांच्यासोबत पुन्हा त्या संस्थेत बाजीराव संचालक!
बाजीराव पानमंद याने त्याचे मास्टरमाईंड डोके वापरत गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्था पुणे जिल्ह्यातील खेड येथील समर्थ गु्रपमधील श्री समर्थ नागरी सहकारी सहकारी पतसंस्थेला विक्री केली. गोरेश्वर मल्टीस्टेट ज्यांना विकली गेली त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या श्री समर्थ गु्रपमध्ये बाजीराव पानमंद हा संचालक म्हणून संचालक आहे. गोरेश्वरची विक्री केली असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी प्रत्यक्षात ज्यांना ही संस्था विकली गेली, त्यांच्याशी निगडीत श्री समर्थ मध्ये बाजीराव पानमंद हाच प्रमुख कारभारी झाला असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

बाबासाहेब तांबे समर्थक पॅनलचा आज प्रचार शुभारंभ
गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या निवडणुकीत माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गोरेश्वर सहकार बचाव मंडळ निवडणुकीत उतरले आहे. या मंडळाचा प्रचार शुभारंभ रविवार, दि. 1 जून रोजी गोरेश्वर मंदिरात होणार आहे. या प्रचार सभेत गोरेश्वर पतसंस्थेत बाजीराव पानमंद आणि त्याच्या टोळीने ठेवीदारांना कसा चुना लावला याचा पाढा वाचला जाणार असल्याची चर्चा आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर, पण कोट्यवधी कमावले! गुजरात टायटन्सलाही लागली लॉटरी

नगर सह्याद्री वेब टीम मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये क्वालिफायर २ मधून...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून सरकारला….

राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभाग रचनेबाबत सुचना मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,...

अहिल्यानगर जिल्हा गोळीबाराने हादरला; भीमराज आव्हाडांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...

नगर शहर हादरलं! युवकांवर गोळीबार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना आणि हिंसाचाराच्या घटना घडत...